एमआयडीसीसाठी पुढाकार घ्या
उदय सामंत ः पोसरेतील सोहळ्यात आवाहन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी एमआयडीसीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण तालुक्यातील पोसरे येथे आयोजित कार्यक्रमात केले.
राज्यातील इतर भागांप्रमाणे येथेही रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पोसरे येथे श्रीदेवी नवलाई, श्रीदेवी वाघजाई, श्री देव खेम व लखोबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. मंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात एमआयडीसीला अनेकदा विरोध होतो; मात्र रोजगारासाठी उद्योग आवश्यक आहेत. साडेतीन हजार कोटींचा कोका-कोला प्रकल्प, लोटे येथील रेल्वे प्रकल्प तसेच रत्नागिरीतील ३० हजार कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख रूपेश घाग, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मयूरी शिर्के, पंचायत समिती सदस्या पूजा जवरत, सामाजिक कार्यकर्ते नासिर खोत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.