कोकण

प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू साठा जप्त

CD

प्रतिबंधित गुटखाजन्य साठा जप्त
धाऊलवल्लीजवळ कारवाई ; ७ लाख ९३ हजाराचा माल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः राज्य शासनाच्या जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंध केलेल्या तंबाखूजन्य पान मसाल्याचे (गुटखाजन्य) साहित्य बाळगल्याप्रकरणी संशयितावर नाटे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडून ७ लाख ९३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मारुती बापू कोकणे (वय ३७, मुळ रा. म्हैशाळ, मिरज, जि. सांगली, सध्या रा. फणसोप, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.२६) सायंकाळी राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली फाट्याजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताकडे धाऊलवल्ली फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य शासनाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधित केलेला ७ लाख ९३ हजार ५६० रुपयांचा तंबाखूजन्य पानमसल्याचे साहित्य आणि ७ लाख ५० हजाराची मोटारीचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाटे पोलिस अमंलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT