कोकण

मालवणची केलेली बदनामी चुकीची

CD

27763

मालवणची केलेली बदनामी चुकीची

स्थानिक रंगकर्मी ः वरेरकर नाट्यगृहाबाबत नगराध्यक्षांशी चर्चा

मालवण, ता. २८ : येथील मामा वरेरकर नाट्यगृहातील असुविधांबाबत ‘आमने सामने’ या व्यावसायिक नाटकाच्या कलाकारांनी सोशल मीडियावर रिल्स बनवून जी बदनामी केली आहे, त्याबाबत मालवणातील स्थानिक रंगकर्मींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाट्यगृहातील समस्यांबाबत कलाकारांची नाराजी रास्त असली, तरी अशा प्रकारे शहराची आणि सांस्कृतिक केंद्राची बदनामी करणे चुकीचे आहे, असे मत मालवणच्या कलाकारांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर स्थानिक कलाकार आणि नाट्यप्रेमींनी नगराध्यक्षा ममता वराडकर यांची भेट घेऊन नाट्यगृहातील समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
काही दिवसांपूर्वी ‘आमने सामने’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान व्यावसायिक कलाकारांनी नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करून नाट्यगृहाची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत मालवण नगर वाचन मंदिर येथे स्थानिक रंगकर्मींची बैठक झाली. हे नाट्यगृह आमचे मंदिर असून मालवणची ओळख आहे. बाहेरील कलाकारांनी समस्या मांडणे योग्य असले तरी, सोशल मीडियावरून केलेली बदनामी क्लेशदायक आहे, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या. स्थानिक शिष्टमंडळाने नगराध्यक्षांशी चर्चा करताना प्रेक्षागृहातील मोडक्या खुर्च्यांची केवळ दुरुस्ती न करता त्या नव्याने बसवाव्यात. नाट्यगृहासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावा आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था थांबवावी. बंद एसी आणि लाईट व्यवस्था तातडीने कार्यान्वित करावी. नगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात नाट्यगृहाच्या देखभालीसाठी दरवर्षी पुरेशी आर्थिक तरतूद असावी. नूतनीकरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अनुभवी स्थानिक रंगकर्मींची समिती नियुक्त करावी. स्थानिक कलावंतांना तालमी व कार्यक्रमांसाठी अल्प भाड्यामध्ये नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या केल्या. यावेळी संजय शिंदे, सुनील परुळेकर, गौरव ओरसकर, सुजाता शेलटकर, महेश काळसेकर, प्रफुल्ल देसाई, शुभदा टिकम, रत्नाकर सामंत, सुधीर गोसावी आदी उपस्थित होते.
------
दुरूस्तीचे काम लवकरच हाती
कलाकारांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, की ‘‘पालिका प्रशासनाने नाट्यगृहाची पाहणी केली असून सर्व समस्या जाणून घेतल्या आहेत. स्वच्छता, खुर्च्यांची दुरुस्ती आणि एसी दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेतली असून इतर प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT