कोकण

घरकुलांबाबत उत्कृष्ट काम; करूळ ग्रामपंचायतीचा गौरव

CD

27772

घरकुलांबाबत उत्कृष्ट काम;
करूळ ग्रामपंचायतीचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ : प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये करूळ ग्रामपंचायतीने (ता.वैभववाडी) जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल बेलापूर (नवी मुंबई) येथे आयोजित कार्यक्रमात कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकारताना सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामविकास अधिकारी शशिकांत गुरव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. करूळ ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत अत्यंत प्रभावी काम केले आहे. गेल्या दोन वर्षांत ग्रामपंचायतीने सुमारे २२ घरकुलांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
या ग्रामपंचायतीने यापूर्वीही बायोगॅस संयंत्र उभारणीत तालुक्यात प्रथम क्रमांक, तसेच ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार मिळवला आहे. सध्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT