कोकण

सावंतवाडीत आज ‘सीईटी’ मार्गदर्शन

CD

सावंतवाडीत आज
‘सीईटी’ मार्गदर्शन
सावंतवाडी, ता. २८ : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘एमएचटी-सीईटी २०२६’ मार्गदर्शन व रणनीती कार्यशाळा उद्या (ता. १) आयोजित केली आहे. ही कार्यशाळा महेश ट्युटोरियल्स, मुंबई व एसकेई कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भोसले नॉलेज सिटी येथील स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे.
कार्यशाळेत शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. संतोष शर्मा यांचे प्रमुख मार्गदर्शन आहे. तसेच गणित विषयासाठी प्रा. राहुल घाडगे, रसायनशास्त्रासाठी प्रा. दीपक आमुंदकर आणि भौतिकशास्त्रासाठी प्रा. सचिन कदम हे विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची सखोल तयारी, अभ्यासाचे प्रभावी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, प्रश्नपत्रिकेचा कल समजून घेणे, तसेच अधिक गुण मिळविण्यासाठी आवश्यक रणनीती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे. सावंतवाडी बसस्थानकाजवळून महाविद्यालयापर्यंत संस्थेतर्फे बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

Mahabaleshwar incident: प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला; महाबळेश्वरमधील पंचनद्यांचे उगमस्थान,'पुरातत्त्व'च्या दुर्लक्षपणामुळे नेमकं काय घडलं!

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

SCROLL FOR NEXT