कोकण

शैक्षणिक कार्य सुरूच ठेवणार ः शिरीष नाईक

CD

27807

शैक्षणिक कार्य सुरूच
ठेवणार ः शिरीष नाईक

आरोसमध्ये निवृत्तनिमित्त सत्कार

आरोंदा, ता. २८ ः आतापर्यंतच्या शिक्षकी पेशात खूप समाधान मिळाले. या क्षेत्रासाठी काहीतरी करता आले. यापुढेही निवृत्त झालो असलो तरी शैक्षणिक क्षेत्रातील कार्य सुरूच ठेवणार, अशी ग्वाही आरोस विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात दिली.
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक नाईक हे आज निवृत्त झाले. या निमित्त प्रशालेतर्फे निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री शारदादेवी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष नीलेश परब, सचिव राजन नाईक, आजगाव प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, आरोस विद्या विहारचे सदाशिव धुपकर, सातार्डा हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, गोविंद मौर्ये, एल.के सावंत, साटेली उपसरपंच बाबा कोरगावकर, साक्षी नाईक, अर्जुन मुळीक, सुरेश गावडे ,माजी मुख्याध्यापक शांताराम आसोलकर, सरोज नाईक, संचालक मिलिंद जोग, बाळा नाबर, विलास साटेलकर ,सुनील नाईक, शैलेश नाईक, दशावतार कलाकार संतोष रेडकर, संदीप नेमळेकर आदी होते. उपस्थितांनी श्री .नाईक यांच्या ३३ वर्षांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. श्री.नाईक यांनी आपल्या कारकीर्दीतील आठवणी सांगितल्या. तानाजी वरक यांनी सूत्रसंचालन केले. अनिल नाईक यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन मुळीक यांनी आभार मानले. देवयानी चव्हाण, श्रद्धा मुळीक, मिताली नाईक, कृपा नेमळेकर, तानाजी खोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT