कोकण

संक्षिप्त

CD

rat1p8.jpg
27886
रत्नागिरी ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये आयोजित प्रदर्शनात सादर केलेले प्रयोग पाहताना शिक्षक.

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये
विज्ञान दिनानिमित्त दिंडी
रत्नागिरीः शहरातील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून विज्ञानाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ‘विज्ञान दिंडी’ ने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी थोर शास्त्रज्ञांच्या वेशभूषेत, तसेच सौरमालेतील ग्रहांच्या प्रतिकृतींसह सहभाग घेतला होता. या दिंडीने परिसरात विज्ञानाचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीनंतर विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. आपल्या प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या सादरीकरणात सर्जनशीलता, सूक्ष्म निरीक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. आंतरशालेय गटनिहाय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विविध फेऱ्यांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यात यलो हाऊसने प्रथम, ब्ल्यू हाऊसने द्वितीय, ग्रीन हाऊसने तृतीय तर रेड हाऊस चौथा क्रमांक पटकावला. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
....
rat1p3.jpg
27881
चिपळूण ः सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थी.

घरडा इन्स्टिट्यूटमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
चिपळूणः लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ''सिनर्जी २०२६'' हे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या सोहळ्यात विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ''आर्ट गॅलरी''चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, रांगोळी, छायाचित्रण, सुलेखन आणि नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेला उपस्थितांनी दाद दिली. या प्रदर्शनानंतर क्रीडा, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अंताक्षरी, नृत्य, गायन, वादन आणि फॅशन शो अशा विविध सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एस. के. ढवळे, प्रा. एस. जी. बोले, सर्व शाखाप्रमुख आणि ''सिनर्जी''चे समन्वयक प्रा. विक्रमसिंह जाधव उपस्थित होते.

--------
rat1p2.jpg-
27880
चिपळूण सती विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.

खेर्डी-चिंचघरी येथे ''मराठी राजभाषा दिन''
चिपळूण ः सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती) येथे ''मराठी राजभाषा दिन'' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयाच्या ग्रंथालयात ''एक तास वाचनाचा'' हा स्तुत्य उपक्रम राबवून वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक संजय वरेकर आणि पिंपळी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूर्वा भोसले यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याचवेळी श्री. रूपेश भोसले यांच्या हस्ते मराठी राजभाषा दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी तन्वी शरद राऊत आणि शर्विल संतोष हातणकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ग्रंथपाल जयंत पवार यांनी मराठी भाषा आणि वाचन संस्कृती या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. संस्कृत शिक्षक पुष्कर कानिटकर यांनी कवी कुसुमाग्रजांसह अन्य दिग्गज मराठी साहित्यिकांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

--------

समाधान राजस्व अभियान सात पासून

चिपळूण ः येथील तहसील कार्यालयाच्या वतीने ''छत्रपती शिवाजी महाराज समाधान राजस्व शिबिर'' अभियान ७ मार्च ते १५ मे या कालावधीत तालुक्यातील ११ महसूल मंडळांत राबवण्यात येणार आहे. यामध्ये अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट शिथिल करणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवीन तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्यावतीकरण यांसारख्या धोरणांचा समावेश आहे. सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांचा दैनंदिन कामकाजासाठी महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी नेहमीच संबंध येत असतो. गावातील तळागाळातील जनतेला पारदर्शक महसूल सेवा, विविध दाखले, शेतकरी नोंदणी व इतर योजनांचा लाभ मिळावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत सावर्डे महसूल मंडळात ७ मार्च, शिरगाव येथे १४ मार्च, वहाळ येथे २० मार्च, कळकवणे येथे २७ मार्च, मार्गताम्हणे येथे १० एप्रिल, रामपूर येथे १७ एप्रिल, असुर्डे येथे २४ एप्रिल, शिरळ येथे ३० एप्रिल, निवळी येथे ४ मे, चिपळूण येथे ८ मे आणि खेर्डी मंडळात १५ मे रोजी हे शिबिर होणार आहे. या संधीचा लाभ सर्व तालुकावासीयांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT