कोकण

सत्कोंडीत ''सृजनोत्सव'' काव्य संमेलनाचा उत्साह

CD

सत्कोंडीत ''सृजनोत्सव'' काव्य संमेलनाचा उत्साह
ज्ञानदीप वाचनालयाचा पुढाकार ; निमंत्रितांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
रत्नागिरी, ता. १ ः शब्दांच्या सुरावली, कवितेचा गंध आणि मायबोलीचा अभिमान अशा चैतन्यमयी वातावरणात रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथे ‘सृजनोत्सव २०२६’ हे निमंत्रित कवींचे काव्य संमेलन उत्साहात पार पडले. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत, कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती आणि ज्ञानदीप वाचनालयाने आयोजित केलेल्या या मैफलीने मराठी भाषेचा जागर खऱ्या अर्थाने यशस्वी केला.
कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग आणि ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय सत्कोंडी यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे सरपंच सतीश थुळ, वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, ज्येष्ठ कवी राष्ट्रपाल सावंत, विलास कोळेकर आणि डॉ. श्रृती कदम यांच्या हस्ते झाली. युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये यांनी कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा गौरव गीत’ सादर करून वातावरणात चैतन्य भरले.
याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मुख्याध्यापक विलासराव कोळेकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवेबद्दल डॉ. श्रृती कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन केले. युवकवी अरुण मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात जिल्हयातील नामवंत कवींनी आपल्या रचना सादर केल्या. राष्ट्रपाल सावंत यांनी ‘ज्ञानज्योती झालीस तू सावित्रीबाई’ आणि ‘सलामी’ या कवितांनी त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर अरुण मोर्ये यांनी ‘देवा मला कारे दिली बायको अशी’ आणि ‘चंद्रावरची शाळा’ या कवितांसह खुमासदार निवेदनाने त्यांनी संमेलनात रंगत आणली. त्याचबोरबर बुद्धीघोष गमरे, विनय होडे, ज्ञानेश पाटील, गुरुदेव नांदगावकर, उमेश मोहिते, शुभम कदम, समृद्धी गोनबरे, अमृता नवाथे, वृषाली कोवळे, किरण टक्के आणि प्रगती शिंदे यांनी आपल्या कविता सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT