फोटो फिचर
क्रीडा कौशल्याचा अभूतपूर्व संगम....!
चिपळूण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या सुसज्ज क्रीडा संकुलात सध्या ''डेरवण युथ गेम्स''चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले युवा खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. मैदानावर केवळ खेळ नाही, तर जिद्द आणि स्वप्नांची उधळण पाहायला मिळत आहे. या क्रीडा महोत्सवातील काही खास वेधक क्षण.
ओळी
rat1p31.jpg-
27946
चिपळूण ः लाल मातीतील खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खो-खो मध्ये खांबावरून विरोधी संघाचा संरक्षक खेळाडू बाद करताना आक्रमण करणाऱ्या संघातील खेळाडू.
rat1p32.jpg-
27947
लंगडी खेळामध्ये चपळाईने बचाव करताना एक खेळाडू.
rat1p33.jpg-
27948
फुटबॉल मैदानावर चपळाईने चेंडूवर ताबा मिळवत, प्रतिस्पर्धी बचावफळीला चकवून ''गोल'' करण्यासाठी खेळाडूंची चाललेली धडपड प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.
rat1p34.jpg-
27949
खो - खो च्या सामन्यामध्ये आक्रमण करणारा खेळाडून संरक्षकाला बाद करण्यासाठी प्रयत्न करताना.
rat1p35.jpg-
27950
बास्केटबॉल कोर्टवर दोन तुल्यबळ संघांमध्ये सुरू असलेली चुरस आणि बास्केट मिळवण्यासाठी हवेत घेतलेली उंच झेप, खेळातील वेगवान थरार अधोरेखित करत आहे.
- rat1p36.jpg-
27951
स्विमिंग (पोहणे) संकुलातील निळ्याशार पाण्याला गवसणी घालत, आपले कसब पणाला लावणारे जलतरणपटू झेप घेताना.
(छाया : नंदन हांडेपाटील, मुंबई)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.