rat1p40.jpg-
27956
रत्नागिरी : केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना सुहास सहस्त्रबुद्धे. सोबत प्रा. श्रीकांत दुदगीकर, स्नेहा पाटील व अन्य.
-------
केळ्ये येथील गोडबोले विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन
रत्नागिरी, ता. १ : केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात राष्ट्रीय विज्ञान दिन व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष स्व. अरुअप्पा जोशी यांचा स्मृतिदिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
प्रतिष्ठित नागरिक सुहास सहस्रबुद्धे व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह तथा शालेय समिती अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर यांच्या हस्ते शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रतिकृती आणि प्रयोग प्रदर्शनात मांडले. मुख्याध्यापिका स्नेहा पाटील यांनी स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळामार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेतील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांची माहिती सांगितली. विज्ञान शिक्षिका अनघा रसाळ यांनी एआयविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.