27971
विद्यार्थ्यांच्या विज्ञान कलाकृतींचे कौतुक
विज्ञान प्रदर्शनास प्रतिसाद; ‘मदर क्विन्स’चा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त काल (ता. २८) सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत विज्ञान, कला व कार्यानुभव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. सी .व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या वैज्ञानिक योगदानाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. संस्थेचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत,सदस्य जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे व प्रकल्प वाखाणण्याजोगे होते. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली व्यक्ती चित्रे, वस्तू चित्रे, स्थिरचित्रे, निसर्ग चित्रे, देखावे तसेच तयार केलेल्या विविध कलाकृती होत्या. विज्ञान, पर्यावरण, सामाजिक प्रबोधन या विषयांवर आधारीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षिका फरजाना मुल्ला, साक्षी सावंत, अस्मिता परब, अर्चिता सुभेदार, कुलदीप कालवणकर, मानसी सावंत, प्रणिता मयेकर यांनी विशेष मेहनत घेतली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत आदींनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.