कोकण

रत्नागिरी- पाणी फाउंडेशनतर्फे फार्मर कपसाठी निवासी प्रशिक्षण

CD

rat1p41.jpg-
27983
लांजा : पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित फार्मर कपसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभागी तालुक्यातील शेतकरी.
----------

लांजात फार्मर कपसाठी निवासी प्रशिक्षण
रत्नागिरी, ता. १ : पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली लांजा तालुक्यातील उमेद आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाअंतर्गत फार्मर कप २०२६ निवासी प्रशिक्षण आयोजित केले. यात स्मार्ट शेतीच्या माध्यमातून गटशेतीच्या प्रमाणित कार्यप्रणालीची (मानक संचालन प्रक्रिया/एसओपी) माहिती देण्यात आली.
झाराप ग्रामपंचायतमधील पाणी फाउंडेशन (ता. कुडाळ) यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने उमेद (रत्नागिरी जिल्हा) आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा रत्नागिरी आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या सहकार्याने याचे आयोजन केले होते. यामध्ये केंद्र व्यवस्थापक मनीष पेडणेकर, डॉ. हर्षदा देवधर, लांजा तालुका कृषी विभाग कृषी अधिकारी श्री. कांबळे, भगीरथ प्रतिष्ठान संस्थेतर्फे सर्व सुविधा लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या.
राज्यातील यशस्वी गटशेतीचे नियोजन केलेले यशस्वी प्रगतशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, अनुभव आणि त्यांनी अनुभवलेली कार्यप्रणाली यांचे यशस्वी कथन शेतकऱ्यांना करण्यात आले. गटशेतीच्या एसओपीचे तंत्र शिकवण्यात आले.
खरीप हंगामाच्या कालावधीत पाणी फाउंडेशनतर्फे फार्मर कप २०२६ चे आयोजन केले आहे. यासाठी गावनिहाय निमंत्रक नेमले असून, कपसाठी निरंतर तांत्रिक सहायता उपलब्धता राहण्यासाठी शेतकरी गटांसाठी कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी लांजा तालुक्यातील समन्वयक संदेश कारंडे आणि रघुनाथ जगताप यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT