rat1p45.jpg
27996
राजापूर ः रोजगारक्षम प्रदूषणविरहित प्रकल्पाची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांसमवेत आमदार किरण सामंत.
-------------
सागवे परिसरात पर्यावरणपुरक प्रकल्प उभारावेत
जनहित प्रकल्प समर्थक संघटना : आमदार किरण सामंतांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः नोकरीसह अन्य कारणांमुळे स्थलांतराचे प्रमाण वाढत चालल्याने अनेक घरे कुलूपबंद आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी तालुक्यातील विल्ये-तारळ-नाणार-गोठीवरे-सागवे परिसरामध्ये ऑटोमोबाईल हबसारखे पर्यावरणपूरक, प्रदूषण विरहीत रोजगारक्षम प्रकल्पांची उभारणी व्हावी, अशी मागणी विल्ये-सागवे येथील जनहित प्रकल्प समर्थक संघटनेच्या वतीने आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे.
या वेळी डॉ. सुनील राणे, विद्याधर राणे, संतोष चव्हाण, फारूक साखरकर, भाई देसाई, विलास कुलकर्णी, जुनेद मुल्ला, जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष विलास अवसरे, अजित नारकर आदी उपस्थित होते.
बदलत्या वातावरणामुळे बागायतींचे उत्पन्न घटत आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होत नसल्याने येथील तरूण रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्यातून, गावांमधील अनेक घरे कुलूपबंद आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम स्थानिक बाजारपेठांवर होवून तेथील आर्थिक उलाढाल रोडावत चालली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगारक्षम उद्योगाची उभारणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी ऑटोमोबाईल हबसारखे पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी व्हावी, अशी मागणी जनहित प्रकल्प समर्थक संघटनेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.