कोकण

सालईवाड्यातील वस्तीत गवे घुसल्याने तारांबळ

CD

28016

सालईवाड्यातील वस्तीत
गवे घुसल्यामुळे तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः शहरातील सालईवाडा परिसरात गुरुवारी (ता. २६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास गव्यांचा कळप भरवस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. नरेंद्र डोंगरावरून खाली उतरलेला हा कळप थेट वनविभागाच्या कार्यालयाजवळील वस्तीत शिरला. अचानक रस्त्यावर गवे आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी धावपळ झाली.
या घटनेमुळे परिसरातील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. ​घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विनोद सावंत यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे अधिकारी चाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या पथकाने सुरुवातीला वाहतूक थांबवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले. त्यानंतर गव्यांना कोणतीही इजा न करता पुन्हा जंगलाच्या दिशेने वळवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ​या मोहिमेत भावेश नाईक, प्रवीण मोरजकर, शेखर नाईक, अमित अरवारी, प्रसाद सावंत, विनोद सावंत आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर हा कळप पुन्हा नरेंद्र डोंगराच्या दिशेने परतवण्यात यश आले. गवे पुन्हा जंगलात गेल्यावर रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT