कोकण

आयनाच्या बायना, शबय... शबय...

CD

28024

आयनाच्या बायना, शबय... शबय...

आजपासून होलिकोत्सव; विविध रंग, पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सज्ज

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १ ः कोकणात महाशिवरात्री उत्सवानंतर ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने शिमगोत्सवाचे वेध लागतात. ग्रामीण भागातील सर्वात लोकप्रिय सण असलेल्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. चाकरमानी मंडळी देखील आपल्या घरी दाखल होऊ लागले आहेत. होळीसाठी लागणारे वेगवेगळे रंग, पिचकाऱ्या, टी-शर्ट आदी विविध साहित्याने बाजारपेठ सजल्याचे दिसून येत आहेत.
फाल्गुन पौर्णिमा ही होळी पौर्णिमा होय. यालाच ‘हुताशणी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने जुने वैरभाव, जुन्या बुरसटलेल्या चालीरीती व घातक परंपरा यांचे समूळ उच्चाटन होणे अभिप्रेत असते. होलिकोत्सव परंपरेप्रमाणे घरगुती व सार्वजनिक स्वरुपात साजरा केला जातो. काही ठिकाणी दीड, पाच, सात, नऊ आणि पंधरा दिवस असा प्रथेप्रमाणे शिमगोत्सव साजरा केला जातो. या पंधरा दिवसांच्या कालावधीत ‘आयनाच्या बायना दोन गोटे खायना.. शबय.. शबय’ असे म्हणत विविध सोंगे घेऊन शिमगोत्सवाच्या निमित्ताने सोंगेकारी गावात घरोघरी शबय मागत फिरतात. यामध्ये हनुमंत, राधाकृष्ण, सिंह, वाघ, राक्षस असे अनेक प्रकारचे वेश धारण करून ही सोंगे गावात ठिकठिकाणी नकला करताना दिसतात. शिमगोत्सवाच्या सणाविषयी प्रत्येकाच्या धार्मिक भावना निगडीत असल्यामुळे आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर स्थित चाकरमानी गावात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
------
उत्सवामागे वैज्ञानिक कारण
होळी उत्सवामागे एक वैज्ञानिक कारणही सांगितले जाते. होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर सुस्त झालेले असते. त्यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करीत असतो. थंडीमुळे स्वस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, हे होळी सण साजरा करण्यामागे वैज्ञानिक कारण मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT