कोकण

पावस-खांबतळे सुशोभीकरण करणारा ठेकेदार गायब

CD

rat3p30.jpg
28379
पावस ः कुर्धे येथील खांबतळ्याचे काम अर्ध्यावर ठेवून ठेकेदार निघून गेल्याने तेथे पडलेले सामान.
rat3p31.jpg-
28383
पावस ः खांबतळ्याभोवती बांधण्यात आलेली दगडी बांधकाम.
---------------
खांबतळे सुशोभीकरण करणारा ठेकेदार गायब
काम अर्ध्यावर सोडून गेल्याने नाराजी; सामान अस्ताव्यस्त तर कामगार, मशिनरीही नेली
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः तालुक्यातील कुर्धे सड्यावरील खांबतळ्याच्या संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम सुरू केले होते. परंतु ५० टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने उर्वरित बांधकाम अपूर्ण ठेवून कामगारांसह पलायन केल्याची चर्चा सुरू आहे. या परिसरातील नागरिकांना या कामामुळे दिलासा मिळणार असतानाच ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवून गेल्याने नाराजीचा सूर निघत आहे
कुर्धे येथील खांब तळ्याच्या संवर्धनाचे व सुशोभीकरणाच्या कामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ऑक्टोबरपासून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. संवर्धनाच्या दृष्टिकोनातून संबंधित तळ्याच्या चारी बाजूने खोदकाम करून दगडी भिंतीचे काम करण्यात आले. यामुळे तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणीसाठा तयार होणार आहे. मात्र आठ दिवसांपूर्वी काम थांबवून ठेकेदाराने बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी व कामगार तातडीने त्या जागेवर हलवले. या कामासाठी आणलेले दगड व जाळ्या तशाच टाकल्या आहेत. या वस्तू योग्य ठिकाणी न ठेवल्यास त्या चोरीस जाण्याची शक्यता असून त्यामुळे शासनाचे नुकसान होणार आहे. खांबतळ्याच्या सुशोभीकरणामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण बनणार होते. मात्र आता येथे टाकलेले सामान, नागरिकांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

चौकट
पाणी योजनेचे कामही अर्धवट
या परिसरामध्ये २०२१ मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम सुरू केले होते. त्यासाठी दोन बोरवेल पाडण्यात आल्या. पाण्याच्या टाकीचे काम करण्यात आले. परंतु २०२४ मध्ये हे सर्व काम अर्धवट स्थितीत टाकून ठेकेदार पळून गेला. गेली ३ वर्षे हे काम अर्ध्यावरच राहीले आहे. याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. खांबतळ्याचीही स्थिती अशीच होणार का? अशी स्थिती निर्माण झाली आहे. तातडीने या संदर्भात संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

कोट
गेली तीन वर्षे या परिसरात नळपाणी योजनेसाठी खोदकाम करण्यात आले. परंतु हे काम अपूर्ण आहे. अशा स्थितीमध्ये खांबतळ्याच्या संवर्धनाचे काम गेले तीन-चार महिने चालू होते, परंतु हे काम अपूर्ण ठेवून ठेकेदार निघून गेला. त्यामुळे हे कामही अपूर्णच राहिले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा करून काम पूर्णत्वास न्यावे.
- सुरेश पानगले, स्थानिक ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT