कोकण

दुचाकीला धडक देऊन मोटारीसह चालक पसार

CD

28385

दुचाकीला धडक देऊन
मोटारीसह चालक पसार

माजगावातील घटनेत दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः माजगाव येथील धोकादायक वळणावर भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जखमी झाले. संतोष नारायण सावंत (रा. कोलगाव) आणि जोसेफ डिसोजा (रा. जुना बाजार, सावंतवाडी) अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सावंत व जोसेफ डिसोजा हे दोघेही मोपा विमानतळावर कामाला आहेत. सोमवारी रात्री उशिरा ते दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत होते. माजगाव येथे मागून भरधाव येणाऱ्या अनोळखी मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात संतोष याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्याला अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथील रुग्णालयात दाखल केले, तर जोसेफ याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस अधिकारी मनोज राऊत व श्री. लोकरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT