कोकण

‘मालवणी करंडक’मुळे नाट्यकलेला उभारी

CD

28393

‘मालवणी करंडक’मुळे नाट्यकलेला उभारी

दीपक केसरकर ः महोत्सवात पुणे, मुंबईचे स्पर्धक सहभागी व्हावे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. (कै.) दिनकर धारणकर यांच्यानंतर नाट्यकलेत पडलेला खंड ‘मालवणी करंडक’च्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला, याचा मला अभिमान आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यात सातत्य ठेवावे, जेणेकरून दरवर्षी पुणे, मुंबईचे स्पर्धक या ठिकाणी येतील. मालवणी भाषेत गोडी आहे. त्यामुळे ती सर्वांना आपलेसे करते, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले.
दरम्यान, मालवणी करंडक महोत्सव घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमोल टेंबकर आणि रुजुल पाटणकर यांच्यासह त्यांच्या टिमचे करावे तितके कौतुक थोडेच आहे, असे सांगून मालवणीसाठी सुरू असलेली त्यांची धडपड कौतुकास्पद आहे, असे ही ते म्हणाले.
ओंकार कलामंच, सावंतवाडी आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित ‘मालवणी करंडक’ महोत्सवाला श्री. केसरकर यांनी भेट दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा महोत्सव समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते केसरकर यांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर करंडक सभेचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष रुजुल पाटणकर, परीक्षक सतीश पाटणकर, उद्योजक चेतन नेवगी आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ उद्योजक चेतन नेवगी यांनी पुरस्कुत केलेला पुरस्कार कुडाळ येथील नाट्य कलाकार अंकुश कुंभार आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन धारणकर यांनी पुरस्कृत केलेला पुरस्कार वेंगुर्ले-आसोली येथील दशावतार कलाकार आनंद नार्वेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
ओंकार डान्स अ‍ॅकॅडमीच्या पूजा पारधी, विश्व डान्स अ‍ॅकॅडमीचे तुळशीदास आर्लेकर, जानू डान्स अ‍ॅकॅडमीच्या जान्हवी सारंग, स्वराज्य अ‍ॅकॅडमीचे हर्ष जाधव, माजी नगरसेवक गोविंद वाडकर, परीक्षक कुणाल मसाले, कृष्णा सावळ, सतीश पाटणकर, सानिका पडवळकर, वैभव केंकरे, प्रशांत मोरजकर आदींचा सन्मान करण्यात आला. सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सावली पाटकर, प्रशांत सावंत, हेमंत पागंम, आर्या टेंबकर, ओम टेंबकर, आराध्या मोरजकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिद्धेश नेरुरकर, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, अंकिता काष्टे, शंशाक काष्टे आदी उपस्थित होते.
---
उपक्रम अतिशय स्तुत्य!
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चांगला झाला. यात समितीने सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. मालवणी भाषा रुजावी, बोलली जावी, यासाठी सुरू असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. या स्पर्धेत सातत्य राहिल्यास पुणे, मुंबई येथील एकांकिका निश्चित या ठिकाणी येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT