कोकण

कबड्डी स्पर्धेत ''पंचक्रोशी जामसंडे'' विजेता

CD

28536

कबड्डी स्पर्धेत ‘पंचक्रोशी जामसंडे’ विजेता

पियाळी येथील स्पर्धा; गिरोबा-सांगेली संघाला उपविजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ४ ः श्री स्वयंभू गांगेश्वर प्रतिष्ठान पियाळी आयोजित जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत गिरोबा-सांगेली संघाला धूळ चारत पंचक्रोशी जामसंडे संघाने चषकावर आपले नाव कोरले.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कणकवली कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने श्री स्वयंभू गांगेश्वर प्रतिष्ठान, पियाळी यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील बलाढ्य संघांचा भरणा असलेली ही स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संतोष कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच प्रवीण उर्फ बंड्या पन्हाळकर, उपसरपंच विजय मुरकर, तन्वी गुरव, संजय ढवण, दामोदर नारकर, बाबू वंजारे, यशवंत तेली, विनोद बंदरकर, सुनील तेली, दाजी तेली, विठोबा साळसकर आदींच्या उपस्थितीत झाला.
अटीतटीच्या सामन्यात सांघिक खेळ करत पंचक्रोशी जामसंडे, गिरोबा सांगेली, पंचक्रोशी फोंडा, सिंधुपुत्र कोळोशी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात जामसंडे व सांगेली संघ एकमेकांना भिडले. यामध्ये सांगेलीला मात देत जामसंडे संघाने चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू मयुर नाईक, उत्कृष्ट चढाई, सुशील पाटकर व सिध्देश्वर भडसाळे ठरले. विजेत्या संघांना अनुक्रमे ११ हजार ०२६, ७ हजार ०२६, २ हजार ०२६, २ हजार ०२६ रोख रक्कम व भव्य चषक देऊन गौरविले. या स्पर्धेचे प्रमुख सुनील तेली, निरीक्षक भुपेश राणे, पंच प्रमुख विशाल पारकर तर पंच म्हणून प्रियांका कोरगावकर, अमिता राणे, उमेश पारकर, अजय जाधव, महेश जाधव, दीपक चव्हाण, राजू बंगे तर समालोचन हरेश सावंत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT