कोकण

ओटवणेत साठ फुटांची ‘होळी’

CD

28548

ओटवणेत साठ फुटांची ‘होळी’
ओटवणे ः येथे पारंपरिक प्रथेप्रमाणे गाव चव्हाट्यावर आंब्याची होळी उभारून सोमवारी सायंकाळी  शिमगोत्सवाला सुरुवात झाली. सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुमारे ६० फूट उंचीची होळी उभारण्यात आली.  येथील शिमगोत्सवात बारा बलुतेदारीचे उत्तम उदाहरण आजही त्याच परंपरेने पहायला मिळते. तिसऱ्या दिवशी हळदवणी कार्यक्रम साजरा होतो. या दिवशीपासून रात्री रोंबाट गाव चव्हाट्यावर हजर होतात. तसेच दैविक निशाण काठी प्रत्येकाच्या घरी पूजेसाठी नेली जाते. यावेळी मानकरी, दैविक सेवकांची उपस्थिती असते. ही रोबांटे चौथ्या व सहाव्या दिवशी वाजतगाजत रात्री गाव चव्हाट्यावर येतात; मात्र पाचवा दिवस कडकडीत बंद पाळला जातो. या दिवशी मूळ  ओटवणे  असलेल्या  सावंतवाडी राजेशाही संस्थानाचा रंगपंचमी कार्यक्रम असल्याने त्यावेळी पूर्ण गाव त्या सोहळ्यात सहभागी व्हायचा. त्यामुळे ती प्रथा आजही पाळली जाते. सातव्या दिवशी रविवारी (ता. ८) सायंकाळी धुळवडीने व रात्री उशिरा घोडेमोडणीने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.
---
28550

पांचाळ यांचा गोव्यात सत्कार
तळेरे : गेली दोन दशकांहून अधिक काळ शिक्षक नसतानाही शिक्षण क्षेत्रात अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सिंधुदुर्गातील सदाशिव पांचाळ यांचा श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता देवस्थान, नवेवाडे-वास्को (गोवा) येथे देवस्थानचे अध्यक्ष तुळशीदास पटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे महासचिव पुंडलिक भोसले, उपाध्यक्ष साईनाथ आमोणकर, सहसचिव राजेश हळर्णकर, खजिनदार संतोष केरकर, सहखजिनदार वासुदेव साळगावकर, सदाशिव पांचाळ यांचे वडील बाळकृष्ण पांचाळ आणि मातोश्री मालती पांचाळ उपस्थित होते. पांचाळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला. श्री. पटेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. पुंडलिक भोसले यांनी आभार मानले.
---
28539

‘पोस्टर प्रेझेंटेशन’मध्ये खोबरेकर प्रथम
मालवण : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या जुहू, मुंबई येथील एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्स येथील विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला आहे. यात मालवणची सुकन्या युगंधा खोबरेकर हिने ‘पोस्टर प्रेझेंटेशन’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. हरियाणातील कुंडली-सोनीपत येथील ‘एनआयएफटीइएम’ संस्थेत आयोजित ‘अन्वेश २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध विभागांत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले. ​भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद झाली. ‘ॲडव्हान्स्ड नेक्स्ट जनरेशन व्हिजन फॉर इमर्जिंग अँड सस्टेनेबल हेल्दी फूड्स’ विषयावर आधारित या परिषदेत जगभरातील २५ पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon News: अखेर प्रतीक्षा संपणार! पुण्यात मान्सूनचे आगमन कधी होणार? हवामान विभागाने तारीखच सांगितली! मोठी अपडेट समोर

Raigad Disabled Protest: रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा ५% निधी रखडला; ९ जूनपासून सामूहिक उपोषणाचा इशारा

Vivo V70 Lite 5G झाला लॉन्च! 6500mAh ची दमदार बॅटरी; 90W फास्ट चार्जिंग, मिडरेंज बजेटचा नवा किंग, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : राजुरा येथील हत्याकांड प्रकरणी ३ पोलीस अधिकारी आणि ३ कर्मचारी निलंबित

Deglur Police Crackdown : कर्कश बुलेट सायलेन्सरवर देगलूर पोलिसांची धडक कारवाई; अनधिकृत बदलांवर जप्ती व दंड

SCROLL FOR NEXT