कोकण

गुरुऋण कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध

CD

rat४p४.jpg-
P२६O२८४८५
रत्नागिरी : डॉ. विकास कशाळकर यांनी रचलेल्या बंदिशींचा कार्यक्रम सादर करताना मुग्धा भट सामंत, मनाली बर्वे, प्रसाद भाटवडेकर, नूतन परब, वाद्यसाथ करताना हेरंब जोगळेकर व श्रीरंग जोगळेकर आदी.
-----
‘गुरूऋण’मध्ये डॉ. कशाळकरांच्या बंदिशींची सुरेल उधळण
भट-सामंत, दाणी-बर्वे, भाटवडेकर व नूतन परब तेजम यांची सादरीकरणे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : प्रख्यात संगीत गुरू डॉ. विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी रचलेल्या बंदिशींचा कार्यक्रम ‘गुरूऋण’ गोदुताई जांभेकर विद्यालयात रंगला. यामध्ये रत्नागिरीमधील गायिका मुग्धा भट सामंत, मनाली दाणी- बर्वे, प्रसाद भाटवडेकर आणि सावंतवाडीच्या नूतन परब तेजम हे शिष्य सहभागी झालेले होते.
तबलावादक हेरंब जोगळेकर यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन झाले. बसंत बहार या जोडरागाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. बसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद फुलांचा बहर, कशाळकर सरांच्या बंदिशीतून नेमका व्यक्त झाला आहे. ‘कोयल बोले अंबुवा की डारी, रूत बसंत की शोभा मन भायी। फुली सुगंध चहू ओर, अंग अंग तर पवन सुहावन लागे।’ ही विलंबित तीनतालातील बसंत बहारची बंदिश मनाली बर्वे यांनी अतिशय रंगतदार सादर करत वसंत ऋतूचा माहोल तयार केला.
डॉ. कशाळकर संगीतामधील अनेक विषयांवर भाष्य करतात. सूफी संगीत प्रसाद भाटवडेकर यांनी सादर केले. सावंतवाडीतील रघुकुल स्वरविहारच्या संचालिका नूतन परब तेजम यांनी नंद रागातील तिलवाडा तालातील सरांची बंदिश आकर्षकपणे सादर केली. ‘माई री मै जागी’ या मुखड्याची डौलदार सम, बंदिशीतील लयीचा डौल छान मांडला. यानंतर गावती रागातील द्रुत बंदिश सादर केली. मुग्ध नादच्या संचालिका मुग्धा भट-सामंत यांनी नट मल्हार रागातील सरांच्या बंदिशी रंजकतेने सादर केल्या. पूर्वांगात नट आणि उत्तरांगात मल्हार असलेला हा राग त्या त्या रागाच्या स्वराकृती नेमक्या दाखवत सादर केला. यानंतर जैत कल्याण या कमी स्वरांच्या रागातील द्रुत बंदिश सादर केली. कार्यक्रमाची सांगता डॉ. कशाळकर यांनी रचलेल्या ओंकार आदिनाद या केदार रागातील चतरंगने झाली. ज्येष्ठ गायक प्रसाद गुळवणी यांच्या हस्ते सर्व कलाकारांना सन्मानित करण्यात आले. हेरंब जोगळेकर यांची तबलासाथ व श्रीरंग जोगळेकर यांनी हार्मोनिअम साथ केली. बंदिशींचे विवेचन श्रोत्यांना सहजपणे रागांची माहिती सांगत डॉ. अंजली दाणी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT