कोकण

लांजा येथील बुद्धिबळ स्पर्धेत उमेश कुलकर्णी विजेते

CD

बुद्धिबळ स्पर्धेत उमेश कुलकर्णी अव्वल
लांज्यात आयोजन ; जिल्ह्यातील १४८ खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ५ : येथील गणपती चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘खुल्या जलद बुद्धिबळ’ स्पर्धेत सातारा येथील उमेष कुलकर्णी यांनी ७.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेला कोकणासह मुंबई, सातारा आणि कोल्हापूरमधील १४८ खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेचे उद्‍घाटन लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली सुनील कुरूप यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर स्कॉर्पिओ सोलरचे संस्थापक रोहित सुर्वे, स्पर्धा संचालिका प्राची सुर्वे, सुचिता सुधीर सुर्वे, अनघा किशोर मयेकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर स्वामी, नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास देसाई, मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे, जिल्हा संघटनेचे सहसचिव चैतन्य भिडे, कोषाध्यक्ष मंगेश मोडक आणि ज्येष्ठ खेळाडू चारुदत्त उपाध्ये उपस्थित होते.
या स्पर्धेत तब्बल ३० फिडे (FIDE) मानांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच शार्दूल तापसे (सातारा) यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. त्यांना अपर्णा शिंदे, चैतन्य भिडे, प्राची सुर्वे, मोहसीन सय्यद आणि कीर्ती मोडक यांनी सहकार्य केले. मनोज रेडीज यांनी सूत्रसंचालन केले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
-----
चौकट
स्पर्धेतील विजेते
स्पर्धेचा निकाल (गटवार): खुला गट : उमेष कुलकर्णी (सातारा), मयुरेश देसाई, साहस नारकर, यश गोगटे, मानस सिधये, सदानंद चौथे, अक्षय खेर, प्रवीण सावर्डेकर, सोहम रूमडे, साहिल बाधणे. महिला गट : तनिष्का अडेलकर, रचना मुणणकर. ज्येष्ठ खेळाडू : संजय कामतेकर, सुनील शिंदे. ३६ ते ५५ वयोगट : विवेक जोशी, मिलिंद नरवणकर, जितेंद्र पटेल. १६ ते ३५ वयोगट : सार्थक साबळे, सचिन कदम, कौस्तुभ हर्डीकर. १५ वर्षांखालील : यश काटकर, यश पवार, नंदन दामले. १२ वर्षांखालील : विहंग सावंत, विराज बनसोड, देवव्रत धूपकर. ९ वर्षांखालील : अन्वय साबळे, तन्मय केसरकर, दीपांशू दळवी. स्थानिक (लांजा) गट : चारुदत्त उपाध्ये, तनिष किनरे, शान बिरवाडकर. विशेष पारितोषिक : वरद चव्हाण (सर्वात लहान खेळाडू).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता तर मला ही संधी मिळाली नसती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

SCROLL FOR NEXT