कोकण

आज जागतिक श्रवण दिन

CD

‘श्रीमान’ कथासंग्रहास
साहित्यरत्न पुरस्कार
रत्नागिरी ः माहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या ‘श्रीमान’ कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कंळबटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसूरकर, माहेर संस्थेच्या विश्वस्त शर्लिन दिदी, निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर, हर्षदा गावडे, पंचायत समिती सदस्य विद्या बोंबले, सरपंच तन्वी कोकजे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, सुनील कांबळे, भिकाजी गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘फार्मसी ॲप्टिट्यूड
टेस्ट’ आज होणार
रत्नागिरी ः राष्ट्रीय परीक्षा बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणारी ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट ही ७ मार्चला संगमेश्वरमध्ये होणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या २०० ते ३०० मीटर परिसरात सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे. आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करू नये. तसेच २०० ते ३०० मीटर परिसरातील एस.टी.डी. बूथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपक आदी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई केली आहे, आदेशात नमूद केले आहे. ही परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ९ ते दुपारी १२ वेळेत होणार आहे.


विभागीय आयुक्तांची
तहसीलला भेट
गुहागर ः कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतीच गुहागर तहसील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ‘समाधान शिबिर’ अभियान टप्पा-१ च्या पूर्वतयारीसह तहसील कार्यालयातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी या भेटीदरम्यान विविध सूचना केल्या. अभियानाच्या पहिल्या टप्प्याची पूर्वतयारी कशी सुरू आहे, याची माहिती त्यांनी घेतली. नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी गुहागरचे तहसीलदार आणि महसूल विभागाचे इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT