कोकण

अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती कार्यक्रम

CD

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश
खेडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खेड शाखेच्या वतीने भरणे येथील सिनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
हा कार्यक्रम खेड तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी समितीचे अनुभवी सदस्य नेत्रदीप तांबे, प्राचार्या डॉ. सूर्यवंशी उपस्थित होते. या प्रसंगी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, नैसर्गिक व मानवनिर्मित घटनांमागील खरे कारण कसे शोधावे, तसेच अंधश्रद्धा कशा प्रकारे पसरवल्या जातात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. काही व्यक्तींकडून हातचलाखीच्या माध्यमातून तथाकथित चमत्कार कसे घडवले जातात, याची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा समितीचे प्रतिनिधी मधुसूदन तावडे व दिनकर पाटील यांनी विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांद्वारे चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली. तसेच रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य संजय काशीद यांनी अंधश्रद्धा व त्यामागील वैज्ञानिक कारणे यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी खेड शाखेचे सदस्य सचिन बेर्डे, राजपाल भिडे, मोहन चव्हाण व सुनील जाधव तसेच तालुका व जिल्हास्तरीय सभासद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: सीमा वादावर बालेन शाहांना ‘सायलेंट मोड’वर कोणी टाकलं? नेपाळमध्ये मोठा राजकीय निर्णय, आता फक्त शिशिर खनालच बोलणार

Latest Marathi News Live Update : दूषित पाणीपुरवठ्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Chess Champion: कार्लसन विसरा, जगाला हादरवणारा 'हा' भारतीय खेळाडू ठरतोय सर्वात धोकादायक; दिग्गजाचा मोठा दावा!

Horoscope : येत्या 72 तासांत बनतोय धनयशस्वी योग! 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ; आर्थिक भरभराटीसह कुटुंबात येईल मोठी खुशखबर

Police Officers Transfer : पुणे ग्रामीण पोलीस दलात ३० अधिकाऱ्यांच्या बदल्या: पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आदेश केले जारी

SCROLL FOR NEXT