Balen Shah: सीमा वादावर बालेन शाहांना ‘सायलेंट मोड’वर कोणी टाकलं? नेपाळमध्ये मोठा राजकीय निर्णय, आता फक्त शिशिर खनालच बोलणार

Nepal India Border Dispute News Update: सर्वपक्षीय बैठकीत नेपाळच्या सत्ताधारी पक्षाचे प्रमुख रवी लामिछाने म्हणाले की, पंतप्रधान बालेन शाह सध्या भारतासोबतच्या सीमावादावर भाष्य करणार नाहीत.
Balen Shah

Balen Shah

ESakal

Updated on

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह सध्या भारतासोबतच्या सीमावादावर भाष्य करणार नाहीत. हा निर्णय नेपाळच्या सत्ताधारी नॅशनल इंडिपेंडंट पार्टीने घेतला आहे. पक्षाचे प्रमुख रवी लामिछाने यांनी काठमांडू येथील सिंह दरबारात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ही घोषणा केली. लामिछाने यांच्या म्हणण्यानुसार, सीमावादावर प्रथम पक्षांतर्गत चर्चा होईल. त्यानंतर केवळ परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल या विषयावर बोलतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com