कोकण

रत्नागिरी - सुवर्णपदक

CD

स्केटिंगमध्ये स्पृहा, अद्वैतला सुवर्ण
डेरवण यूथ गेम्स ; ‘वॉल क्लाइंबिंग’मध्ये पूणे अव्वल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : तालुक्यातील सावर्डे-डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित ‘डेरवण यूथ गेम्स’मधील स्केटिंग स्पर्धेत आठ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात ठाण्याची रिहा शेट्टी, १० वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरीची स्पृहा सुर्वे, तर १० वर्षांखालील मुलांच्या गटात रत्नागिरीचा अद्वैत बहुतुले हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. डेरवण येथे झालेल्या स्पर्धेत ८ वर्षांखालील गटात रत्नागिरीच्या शिवांश महाडीक याने रौप्य, तर सिंधुदुर्गच्या देवांश कोळी याने कांस्य पदक मिळविले. १० वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरीच्या नेहा शिंदे हिने रौप्य, तर प्रिशा चव्हाण हिने कांस्य पदक पटकावले. याच वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वतेज लाड याने रौप्य, तर गौरांश कित्तूर याने कांस्य पदक मिळविले. वॉल क्लाइंबिंग स्पर्धेमध्ये पुणे संघाने अव्वल स्थान पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या गटात रत्नागिरीच्या सृजन पटवर्धन याने सुवर्णपदक पटकावले, तर साताऱ्याच्या आशिष जगताप याने रौप्य पदक मिळविले. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात साताऱ्याच्या तनुजा महाडिक हिने कांस्य पदक पटकावले. ही तीन पदके वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या आयुष पवार याने सुवर्ण, विराज फाळके याने रौप्य, तर ईशान सूर्यवंशी याने कांस्य पदक पटकावले. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याची वेदा चौधरी सुवर्ण, तर इरावती ताटूस्कर रौप्य पदकाची मानकरी ठरली. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या मौला सय्यद याने कांस्य पदक मिळविले. तसेच १५ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याची ईशा वाघमारे हिने सुवर्ण, काव्या माळी हिने रौप्य आणि मीरा चौधरी हिने कांस्य पदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prada Kolhapuri Chappal : ‘प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायरर्ड बाय कोल्हापुरी चप्पल’, कापशी पायतानचा ब्रॅण्ड प्राडाने स्वीकारला

Chhatrapati Sambhajinagar: न्यूझीलंडशी कराराने उद्योगांना बळ; मराठवाड्यातील उद्योजकांकडून स्वागत

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीतील स्क्रॅप गोडवूनला भीषण आग

Ramdas Athawale: ‘भोंदूगिरी रोखण्यासाठी बुवा-बाबांची चौकशी व्हावी’: राज्यमंत्री रामदास आठवले, शिवाजी महाराजांवरील वक्तव्य वादग्रस्त!

Police Bribery Case Kolhapur : भुदरगड पोलिस ठाण्याच्या हवालदाराने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली अन्, रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी, कारणही धक्कादायक

SCROLL FOR NEXT