कोकण

चिपळूण ः खेर्डीतील सुखाईची पालखी तंत्रज्ञानाने सुसज्ज

CD

rat6p4.jpg -
28930
चिपळूण- आधुनिक सुविधांनी सुसज्ज केलेली खेर्डी श्री. ग्रामदेवी सुखाई देवस्थानची पालखी

खेर्डीतील सुखाई देवीची
पालखी तंत्रज्ञानाने सुसज्ज
हायटेक स्वरुपासाठी देवस्थान समितीचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः धार्मिक परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खेर्डी गावातील श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थान समितीने यावर्षी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करून, शिमगोत्सवातील ग्रामदेवतेची पालखी आता सीसीटीव्ही, वाय-फाय आणि लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहे.
यावर्षी खेर्डी येथील श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थानची पालखी हायटेक स्वरूपात भक्तांच्या सेवेत दाखल झाली. या पालखीत वाय-फाय सुविधा, सिसीटिव्ही कॅमेरे, इनव्हर्टर व्यवस्था तसेच लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग प्रणाली बसवण्यात आली. पालखीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच हा उपक्रम करण्यात आला आहे. चिपळूण शहरालगत असलेल्या खेर्डी गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाढत्या शहरीकरणाचा वेध घेत श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेंबेकर यांनी विश्वस्थांना विश्वासात घेत गावात घरोघरी फिरणाऱ्या पालखीत वाय-फाय सुविधा, सिसीटिव्ही कॅमेरे, इनव्हर्टर व्यवस्था तसेच लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला. पालखी कोणत्या भागात पोहोचली याची अचूक माहिती देवस्थान अध्यक्षांच्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे. या व्यवस्थेमुळे पालखीचे सुरक्षा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुकर झाले आहे. पालखीच्या सुरक्षेला बळकटी मिळाली असून भाविकांच्या गर्दीचे योग्यरित्या नियोजन ही केले जात आहे.

चौकट
ग्रामस्थांना मिळते अचूक माहिती
पालखीमध्ये इनव्हर्टर असल्यामुळे विजपुरवठा खंडीत झाल्यास पालखीतील दिवे व सिसिटिव्ही यंत्रणा सुरू राहते. तसेच लाईव्ह लोकेशन प्रणालीमुळे ग्रामस्थांना पालखीचे आगमन कधी होणार, याची अचूक माहितीही ग्रामस्थांना मिळत आहे. कोकणातील ग्रामदेवतांच्या पालखीत अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणारा हा पहिलाच उपक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT