कोकण

पाणीपुरवठ्यासाठी केवळ एकच टँकर उपलब्ध

CD

पुरवठ्यासाठी केवळ एकच टँकर
खेड तालुक्यातील स्थिती ; टंचाई आराखड्यात ३३ गावे
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या उष्णतेमुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहिरी, बोअरवेल तसेच अन्य जलस्रोतांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. या वर्षी पाणीटंचाई आराखड्यात तालुक्यातील संभाव्य ३३ गावांमधील ५० वाड्यांचा समावेश आहे. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे केवळ एकच टँकर उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षीही तारेवरची कसरत होणार आहे.
पंचायत समिती खेड आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात तालुक्यातील ३३ गावे आणि ५० वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे केवळ एकच टँकर उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व गावांपर्यंत नियोजनबद्ध पाणीपुरवठा करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कृती आराखड्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम, गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, तहसीलदार सुधीर सोनवणे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेडचे एस. व्ही. बुटाला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT