कोकण

मुणगेतील शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता

CD

29244

मुणगेतील शिमगोत्सवाची धुळवडीने सांगता

पारंपरिक सोहळा; देवी भगवतीच्या साक्षीने रंगले कार्यक्रम

मुणगे, ता. ७ :येथील श्री देवी भगवती मंदिरामध्ये शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. काल सायंकाळी धुळवडीच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली. शिमगोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेने झाली असून, या निमित्ताने मुंबईकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुणगे येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री देवी भगवती मंदिरात शिमगोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. या उत्सवात गावातील बांबरवाडी, कारिवणेवाडी, भंडारवाडी, लब्देवाडी आणि आडवाडी या वाड्यांचे ‘मांड’ असून, या मंडळांची ‘रोंबटी’ भगवती मंदिरात नाचविली जातात. प्रत्येक मंडळाला शिमगोत्सवाचे पाच दिवसांतील ठराविक दिवस नेमून दिलेले आहेत. पूर्वापार चालत आलेल्या रितीप्रमाणे प्रत्येक मंडळ आपला कार्यक्रम भगवती मंदिरात सादर करते.
सोमवारी दुपारी बांबरवाडी येथील श्री. दळवी यांच्या माड-बागायतीतून पोफळीच्या (सुपारीच्या) झाडाची होळी ढोल-ताशांच्या गजरात आणली. तिला ‘आंबेली’ (आंब्याची पाने) बांधून ग्रामस्थांनी दोरखंड व बांबूच्या साहाय्याने उभी केली. त्यानंतर विधीवत पूजा, गाऱ्हाणे आणि नारळ ठेवून होळीचा शुभारंभ झाला. मंगळवारी रात्री बांबरवाडी व कारिवणेवाडी यांची रोंबटी घुमटे व ढोल-ताशांच्या तालात नाचवली. दरम्यान, लब्देवाडी व भंडारवाडी यांनी ‘कवळ’ पेटवून होळीला पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर बांबरवाडी मंडळाचा तमाशा सादर झाला. बुधवारी रात्री सर्व वाड्यांच्या रोंबटांनी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. रात्री कारिवणेवाडी मंडळाने ‘दशावतारी नाटक’ सादर केले. गुरुवारी रात्री लब्देवाडी व भंडारवाडी यांच्या रोंबटांचे सादरीकरण झाले, तर लब्देवाडी मंडळाने तमाशा सादर केला. पाचव्या दिवशी दुपारी बांबरवाडी व हरिजनवाडी मंडळांचे तमाशे झाले. भाविकांनी होळीला नवस फेडले व नवीन नवस बोलले. येथे होळीला नारळ व गुळाचा नवस करण्याची पद्धत आहे. तसेच, वर्षात नवीन विवाह झालेल्या वराकडून होळीला पाच नारळांचे तोरण आणि गूळ देण्याची प्रथा आजही जोपासली जाते. सायंकाळी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून रोंबटी मंदिरात नेण्यात आली. देवीची आरती झाल्यानंतर महाजनांनी गुलाल उधळला. ‘नौबत’ वाजवून आणि एकमेकांना गुलाल लावून धुळवड साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी होळीजवळ जमा झालेल्या नारळ व गुळाची ‘शिरवणी’ (प्रसाद) ग्रामस्थांना वाटण्यात आली. देवस्थान समितीचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन आणि सचिव निषाद परुळेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

SCROLL FOR NEXT