कोकण

क्राईम

CD

संशयितरीत्या
फिरणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील साईनगर-कुवारबाव येथे संशयितरीत्या फिरणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कातकरी असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) रात्री पावणेबाराच्या सुमारास साईनगर-कुवारबाव येथील एका घराच्या कंपाउंडमध्ये निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित एकनाथ कातकरी हा रात्रीच्यावेळी संशयास्पदरित्या फिरताना सापडला. त्याच्याकडे घरफोडी व चोरीसाठी लागणारे हत्यारे सापडली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

गावठी दारू
बाळगणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील मांडवी किनारी अंतर्गत रस्त्यावर गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश विजय बिर्जे (वय ४५, रा. पेठकिल्ला-कोठारवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) रात्री मांडवी समुद्र किनारी जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे विनापरवाना ९५० रुपयांची १० लिटर दारू सापडली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी
दारू पिणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड येथील खारभूमी मैदानात मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश गणपत माचिवले असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी मालगुंड खारभूमी मैदान येथे निदर्शनास आली. या प्रकरणी महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT