29400
कणकवलीत महिला दिनी स्वच्छता
कणकवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरात रोटरी क्लब आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात प्रभाग सातमधील परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात नगरसेविका सुप्रिया नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, रोटरी क्लबच्या वर्षा बांदेकर, निधी निखार्गे, शिल्पा सामंत, मिता कवडे, नीलिमा वालावलकर, राज नलावडे, निनाद ढवळे, आकाश सामंत, भावेश निग्रे, तसेच नगरपंचायत कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.