Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Know About Arshad Khan: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्सला विजय मिळवून देण्यात अर्शद खानने मोलाचा वाटा उचलला. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला, जाणून घ्या.
Gujarat Titans

Gujarat Titans

Sakal

Updated on

IPL 2026 Gujarat Titans news: आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुजरात टायटन्सने गुरुवारी (३० एप्रिल) ४ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. बंगळुरूचा हा तिसरा पराभव होता.

गुजरातकडून चांगला सांघिक खेळ या सामन्यात झाला, पण त्यातही एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. तो खेळाडू म्हणजे अर्शद खान (Arshad Khan). २८ वर्षीय अर्शदने गुजरातला बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

अर्शदसाठी यंदाच्या हंगामातील हा दुसराच सामना होता. त्याने याआधी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामना खेळला असून त्या सामन्यातही त्याने २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना त्याने रजत पाटिदार, कृणाल पांड्या आणि वेंकटेश अय्यर असे तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने केवळ २२ धावा देत या तीन विकेट्स घेत बंगळुरूची मधली फळी खिळखिळी केली होती.

<div class="paragraphs"><p>Gujarat Titans</p></div>
IPL 2026, RR vs DC: अडखळलेल्या दिल्लीला स्टार्कच्या पुनरागमनाचा दिलासा; आज राजस्थानशी लढणार; पाहा कशी असेल Playing XI
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com