Thane: ‘घोडबंदर’चा बोजा ठाणे पालिकेवर, देखभालीसाठी अडीच कोटींचा खर्च

Thane Municipal Corporation: सार्वजनिक बांधकाम विभागाने घोडबंदर मार्गाच्या दुरुस्तीचा खर्च ठाणे महापालिकेकडे सोपवला आहे. यामुळे आता ठाणे महापालिकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे.
Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation

ESakal

Updated on

ठाणे : वसई, पालघर तसेच गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा घोडबंदर मार्ग अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या हस्तांतरणावेळी शासनाने काही अटी घातल्या असून, त्यानुसार या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचा संपूर्ण खर्च आता ठाणे महापालिकेलाच करावा लागणार आहे. यामुळे पालिकेवर आर्थिक बोजा वाढणार आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आल्याने रस्ते आणि उड्डाणपुलांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com