29435
बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध
रुपेश पावसकर ः नेरुर येथे ‘नारीशक्ती’तर्फे महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः ‘‘नेरुरच्या पर्यटन विकासात महिला बचतगटांचे मोठे योगदान आहे. बचतगटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी व ग्रामसंघाच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केले.
उमेद अभियानांतर्गत माणकादेवी येथील नारीशक्ती ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. ७) नेरुर माणकादेवी शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री. पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंचायत समिती सदस्य दीप्ती नाईक, नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर, संगम प्रभाग संघ अध्यक्ष सोनाली चव्हाण, सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेरुर बँक अधिकारी हिमांशु आर्या, उज्वल कांबळी, पुष्पा वालावलकर, पुष्पलता म्हाडदळकर, प्रभाकर गावडे, अरुणा चव्हाण, ऋचा पावसकर, स्वप्नाली बुगडे, श्वेता मार्गी, प्रियदर्शनी गावडे, नेहा गावडे, प्रिया धर्णे आदी उपस्थित होते.
श्री. पावसकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. नेरुर गाव विकासाकडे वाटचाल करत आहे. येथील कर्ली नदीवर जलक्रीडांतर्गत विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पावले टाकायची आहेत. यासाठी सर्वांची साथ महत्त्वाची आहे. ग्रामसंघाच्या माध्यमातून अनेकांनी उद्योग क्षेत्राकडे वाटचाल केली, हे कौतुकास्पद आहे.’’
सरपंच घाडीगावकर म्हणाल्या, ‘‘स्त्रीशक्ती ही आदिशक्ती आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरत आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. बचतगटातील महिलांना सक्षम करण्यासाठी बँका कार्यरत आहेत.’’ महिला दिनानिमित्त माणकादेवी येथील सुमारे पंचवीसहून अधिक ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रियदर्शनी गावडे यांनी सूत्रसंचालन केले. महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. त्यातील विजेत्या तीन महिलांना आकर्षक भेटवस्तू दिल्या.
.....................
दिव्यांग भगिनींचा सन्मान
माणकादेवी येथील दिव्यांग भगिनी गीता गावडे लाडू, चुनकापांच्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. याबाबत सर्वांनी त्यांचे कौतुक केले. संजीवनी परब या सुद्धा छोटा व्यवसाय करून आपले कुटुंब चालवितात. या दोन्ही कर्तबगार महिलांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.