29503
शिवरायांच्या चरित्रातून शौर्याची प्रेरणा
भूषण साटम ः भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ ः ‘‘शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन संकटांवर मात करणे शौर्याचे आहे. कोणतेही काम छोटे नसून ते प्रामाणिकपणे व नीटनेटकेपणाने केल्यास यश निश्चित मिळेल,’’ असे प्रतिपादन ‘शिवराजभूषण’ नाटकाचे निर्माते भूषण साटम यांनी शिवचरित्रावर विचार मांडताना केले.
येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ‘शिवशंभू विचारमंच सिंधुदुर्ग’चे संयोजक, तसेच ‘शिवराजभूषण’चे नाट्यनिर्माते भूषण साटम यांनी शिवचरित्रावर विचार मांडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर नृत्य सादर केले. शिवप्रतिमा, तसेच देवी सरस्वती यांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य हणमंत तिवले यांनी प्रमुख व्याख्याते साटम यांचे स्वागत केले. प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविकात राष्ट्रहितार्थ थोर पुरुषांचे बलिदान व भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा विशद केली.
श्री. साटम यांनी शिवचरित्रावर विचार मांडत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उभा केला. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला उभारणी, हिरोजी इंदुलकर यांनी केलेले कार्य, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तीन ऐतिहासिक दाखले देणाऱ्या घटनांची माहिती दिली. संचिता परब व दिया गोलतकर या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. प्रा. गोसावी यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.