कोकण

कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्षच बनले परीक्षार्थी

CD

कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्षच बनले परीक्षार्थी!
गैरप्रकारांना ‘डिजिटल’ लगाम; स्क्रीन रेकॉर्डिंग, ॲप ब्लॉकिंग; त्रयस्थ पर्यवेक्षक अन् सीसीटीव्ही निगराणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांच्या ऑनलाईन परीक्षांसाठी कोकण विभागीय मंडळाने कडक सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. यंदा प्रथमच स्क्रीन रेकॉर्डिंग, ॲप ब्लॉकिंग आणि त्रयस्थ पर्यवेक्षक'' यासारखी पावले उचलण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेची खातरजमा करण्यासाठी कोकण-कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतः एका परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थ्याप्रमाणे ‘डेमो एक्झाम’ दिली.
आयटी विषयाची परीक्षा बहुतांशी मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांतच होणार असली तरी, कोल्हापूर विभागात दोन आणि कोकण विभागात तीन ठिकाणी अपवाद म्हणून अन्यत्र केंद्रे देण्यात आली आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा येत्या १२ ते १४ मार्च रोजी सकाळी ११ ते १.४० आणि दुपारी ३ ते ५.४० या दोन सत्रांत होईल. यामध्ये रिकाम्या जागा भरा, चूक की बरोबर, बहुपर्यायी प्रश्न आणि कोडिंगवर आधारित प्रश्न विचारले जातील. सामान्यज्ञान विषयाची परीक्षा १६ ते १८ मार्चदरम्यान होईल. ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ असून १०० गुणांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाईल.
प्रथमच विद्यार्थ्यांच्या संगणकावरील स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार असून, त्याची फाईल संगणकाच्या ‘सी’ ड्राईव्हमध्ये जतन केली जाईल. यासाठी प्रत्येक संगणकावर किमान ३ जीबी जागा मोकळी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, परीक्षा कालावधीत संबंधित संगणकावर गुगल क्रोम, चॅट जीपीटी, टीम व्ह्यूअर, एनीडेस्क किंवा अल्ट्रा व्ह्यूअर यांसारख्या कोणत्याही अन्य ॲप्लिकेशनचा वापर करता येणार नाही. परीक्षेच्या तांत्रिक मदतीसाठी विभागीय समन्वयक म्हणून सचिन नाईक (कोकण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर रत्नागिरीसाठी समृद्धी बावधनकर आणि सिंधुदुर्गसाठी प्रसन्नकुमार मयेकर हे समन्वयक म्हणून परीक्षा कालावधीत तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देतील. परीक्षा आयोजनाबाबतच्या सर्व सूचना कोकण विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांना दिल्या आहेत.

चौकट १
२०३४ विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार
रत्नागिरी जिल्ह्यात ५० आयटी केंद्रांवर ३,१४१ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावर ३८ विद्यार्थी अशी एकूण ३,१७९ संख्या आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ आयटी केंद्रांवर १,९९४ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावर ४० विद्यार्थी असे एकूण २,०३४ विद्यार्थी ही ऑनलाईन परीक्षा देतील. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्हास्तरावरून भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आल्या आहेत.

कोट
बारावीची ऑनलाईन परीक्षा लेखी परीक्षेप्रमाणेच गांभीर्याने घेण्यात येईल. गैरप्रकारांना पायबंध घालण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय उपायोजना करण्यात आल्या आहेत.
- राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT