कोकण

राजापूर रुग्णालयात रक्त संकलन केंद्राला मंजुरी

CD

रक्तासाठीची धावपळ आता थांबणार
राजापूर ग्रामीण रुग्णालयात, रक्तसंकलन केंद्राला शासनाची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते रत्नागिरी या दरम्यानच्या आरोग्य केंद्रामध्ये रक्तसंकलन केंद्र नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्त संकलन केंद्र उभारणी व्हावी अशी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने मागणी केली जात आहे. त्याला यश आले असून राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्त संकलन केंद्राला शासन मान्यता मिळाली आहे.
आमदार किरण सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रक्तसंकलन केंद्राला शासन मंजुरी मिळाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून राजापूर तालुक्यात रक्तपेढी किंवा रक्त साठवण केंद्र नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला तसेच तातडीच्या उपचारांची गरज गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. बहुतांश वेळा रुग्णांच्या नातेवाईकांना रत्नागिरी, कोल्हापूर किंवा इतर शहरांमध्ये जाऊन रक्ताची व्यवस्था करावी लागत होती. त्यामुळे अनेकदा उपचार प्रक्रियेत विलंब होत असल्याची तक्रार होत होत्या. त्यामुळे रक्तसंकलन केंद्राची मागणी होत होती. राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे रक्त साठवण केंद्र सुरू करण्यासाठी अनेक बैठका, पत्रव्यवहार आणि अधिकाऱ्यांशी सुरू होती. त्याला यश आले आहे.
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील या रक्त साठवण केंद्राच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच रक्त उपलब्ध होणार आहे. विशेषतः अपघात, प्रसूतीदरम्यान उद्‍भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत तसेच गंभीर आजारांमध्ये तातडीने रक्ताची गरज भासल्यास हे केंद्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT