29539
सावंतवाडीत नारीशक्तीला सलाम
पालिकेत महिला दिन; कर्तबगार महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. येथील बॅ. नाथ पै सभागृहात नारीशक्तीचा जागर करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व नगरपरिषदेमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, उपसभापती सुनिता पेडणेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, पोलिस कॉन्स्टेबल सावी पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला दिनाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अनंत चिंचकर, कबीर हेरेकर, समृद्धी गावडे, जीया शेख, जियाद शेख, प्रज्ञा मोंडकर, तृप्ती राऊळ, नेहा बांदेकर, स्तुती गुरव, अनुराधा महाजन, हर्षा देऊलकर, गोकुळी बुवा, सुप्रिया गावडे, अनिशा राणे, सुमीधा नाईक, प्रतिभा चितारी, विजय सुकी, अकीलाबाणु पटेल, नुपूर मठकर, महिला पत्रकार जुईली पांगम व अनुजा कुडतरकर, प्रज्ञा पांचाळ, निधी खडपकर, साक्षी रामदूरकर, सपना म्हापसेकर, वेणू सावंत आदींचा विशेष सन्मान झाला.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला कर्मचारी प्राची पाटील, प्राजक्ता कांबळे, आसावरी केळबाईकर, माधवी म्हापसेकर, परवीन शेख, नेहा आडेलकर, सोमिया चव्हाण, रेश्मा मेहतर, अनिता होडावडेकर, सपना जाधव, सुकन्या कुलकर्णी, शीतल वाळके, लीना राणे, शमिका नेमळेकर, संजीवनी शिरसाट, गौरवी कुडाळकर, गौरी नाईक, रजनी शिंदे, प्रज्ञा काणेकर, भारती लाखे, गीता बरागडे, संगीता कदम, जया कदम, दशमी लाड, जया कदम, आशा बरागडे, संगीता कदम, अनुष्का सनम, गौतमी तेंडोलकर, रिया झोरे, अंजली वेंगुर्लेकर, गीता जाधव, नीता कुडतरकर, सुगंधा चोडणकर, मीनाक्षी पवार, लक्ष्मी कांबळे आदीचा सन्मान झाला. फनी गेम्समधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रा. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली भालेकर यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.