कोकण

कुडाळात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

CD

swt99.jpg
29699
कुडाळ ः कोमसापतर्फे महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना गौरविण्यात आले.

कुडाळात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
‘कोमसाप’चा उपक्रम; राऊळ महाराज महाविद्यालयात महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ आणि कोमसाप शाखा कुडाळ यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १७ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात झाला. रविवारी (ता. ८) महिला दिनी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, शाल, सन्मानचिन्ह, वृक्ष आणि ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘कोमसाप’ जिल्हाध्यक्ष मंगेश मसके होते. कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिका संजीवनी देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक संचालिका नीता राणे, कादंबरीकार वृंदा कांबळी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. अनंत वैद्य, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर, जिल्हा सचिव संतोष सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, कार्यकारिणी सदस्य संदीप वालावलकर आदी उपस्थित होते.
कुडाळ तालुका सचिव सुरेश पवार यांनी स्वागत केले. ​या सोहळ्यात कुडाळ महिला रुग्णालयाच्या डॉ. गायत्री पालयेकर, शंभरहून अधिक गड-किल्ले सर करणाऱ्या नुपूर मठकर, पत्रकार अनुजा कुडतरकर, वर्षा वैद्य, स्वाती वालावलकर, रिया शिवगण, साधना माडये, प्रतीक्षा बागायतकर, प्रिया पांचाळ, पल्लवी सावंत, सरिता पिंगुळकर, प्रणया धुरी, मनीषा मसके, साक्षी धुरी आणि साक्षी कविटकर या रणरागिणींचा सन्मान करण्यात आला.
​डॉ. गायत्री पालयेकर, साधना माडये, स्वाती वालावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी नीता राणे यांनी जिल्हा बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. वृंदा कांबळी आणि संजीवनी देसाई यांनी मार्गदर्शन केले. ​अध्यक्षीय भाषणात मंगेश मसके यांनी कुडाळ शाखेने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. जिल्हा सचिव संतोष सावंत यांनी आभार मानले. राहुल कदम (सावंतवाडी) यांनी सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला कवी विठ्ठल कदम, प्रदीप केळुसकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT