कोकण

रुग्णांशी सहानुभूतीपूर्वक संवाद गरजेचा

CD

swt910.jpg
29672
नेरुर : बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात डॉ. अनिल नेरुरकर यांचा सत्कार करण्यात आला. (छायाचित्र : अजय सावंत)

रुग्णांशी सहानुभूतीपूर्वक संवाद गरजेचा
डॉ. अनिल नेरुरकर : नेरुर येथे महिला दिनानिमित्त मार्गदर्शन
सकाळ वृत्त्तसेवा
कुडाळ, ता. ९ : आरोग्यसेवा क्षेत्रात परिचारिका आणि फिजिओथेरपिस्ट यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत प्रभावी संवाद हा एक कळीचा घटक असून, परिचारिकांनी रुग्णांशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. योग्य संवादामुळे रुग्णांना मानसिक आधार मिळतो, ज्याचा सकारात्मक परिणाम उपचार प्रक्रियेवर होतो, असे प्रतिपादन डॉ. अनिल नेरुरकर यांनी केले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग) संचलित, बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नेरुर येथील (कै.) यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. नेरुरकर यांनी ‘परिचारिका-रुग्ण संवाद कौशल्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘रुग्णसेवा करताना परिचारिका आणि फिजिओथेरपिस्ट यांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात काम करताना येणाऱ्या ताणतणावाचा सामना करण्यासाठी नियमित व्यायाम, सकारात्मक विचार आणि मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे.’’
यावेळी डॉ. नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि प्रामाणिकपणे कार्य करून समाजाच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रा. कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. प्रथमेश हरमलकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Plans: महिलांना भविष्यात आर्थिक टेन्शन नको? मग या 7 ठिकाणी गुंतवणूक केली तर तयार होईल मोठा फंड

Ration Card: केंद्र-राज्य सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्डचे 'हे' ५ नियम बदलले; यादीतून नाव काढले जाणार? जाणून घ्या नवे निकष...

Viral Video : सुनील गावस्करांनी वचन पाळले, टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 'झिंगाट' डान्स...

हाणामारी होण्याइतकं सलमान शाहरुखमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण, अभिनेता स्वत: खुलासा करत म्हणाले... 'वादाचं मुख्य कारण....'

Latest Marathi News Live Update : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अपघातात विद्यार्थ्याचा डोळा निकामी

SCROLL FOR NEXT