- rat९p४.jpg-
२६O२९६८७
रत्नागिरी : महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांमधील विजेत्यांसमवेत मागे उभे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव, जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, अॅड. विलास पाटणे, अॅड. शाल्मली आंबुलकर आणि न्यायिक अधिकारी.
महिला वकिलांची स्पर्धांत सरशी
महिला दिनानिमित्त आयोजन ; बार असोसिएशन, विधी प्राधिकरणाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : रत्नागिरी बार असोसिएशन व विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकिलांच्या विविध स्पर्धा शहरातील वेगवेगळ्या क्रीडा संकुलामध्ये घेण्यात आल्या.
बक्षीस वितरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव, जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर व रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, महिला उपाध्यक्ष अॅड. शाल्मली आंबुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एच. एस. भोसले, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. व्ही. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बि.डी. तारे, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी. एस. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी. एस. संकपाळ, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी (वर्ग १) के. एस. पाटील, रत्नागिरी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. निनाद शिंदे, महिला प्रतिनिधी अॅड. मीरा देसाई, सहसचिव अॅड. राहुल चाचे उपस्थित होते.
बुद्धीबळ स्पर्धेत अॅड. चैताली नागवेकर या विजयी तर अॅड. गौरी सावंत या उपविजयी झाल्या. बॅडमिंटन स्पर्धेत अॅड. श्रद्धा कांबळे विजयी तर देवयानी राजेशिर्के उपविजयी झाल्या. पाककला स्पर्धेतील शाकाहारी पदार्थ बनविण्यात अॅड. मैथिली जाधव, अॅड. अश्विनी साळवी यांनी यश मिळवले. मांसाहारी पदार्थात अॅड. अपेक्षा सकपाळ, अॅड. मैथिली जाधव अव्वल ठरल्या. फनी गेम्स स्पर्धेत अॅड. प्रतीक्षा भानुशाली प्रथम तर अॅड. श्वेता मोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये अॅड. अपूर्वा राणे प्रथम तर, द्वितीय क्रमांक अॅड. अनुष्का बापट आणि तृतीय क्रमांक अॅड. कार्तिकी शिंदे व अॅड. प्रतिभा पवार यांना विभागून देण्यात आला.
जलद चालण्याच्या स्पर्धेत अॅड. प्रणिता चव्हाण यांनी प्रथम तर अॅड. तन्वी गद्रे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये चार संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी अॅड. प्रणिता चव्हाण यांचा संघ विजयी झाला तर अॅड. ममता मुद्राळे यांचा संघ उपविजेता ठरला. रांगोळी स्पर्धेमध्ये अॅड. श्वेता शिवगण यांनी प्रथम, रंजना झोरे यांनी द्वितीय तर अॅड. नेहा नलावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.