rat१०p१.jpg-
P२६O२९८६३
साखरपा : अमित पंडित यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
-----
(दोन कॉलम)
अमित पंडित यांच्या ‘व्हाईट बोर्ड’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील शिक्षक आणि ‘सकाळ’चे बातमीदार अमित पंडित यांच्या ‘व्हाईट बोर्ड’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. पंडित यांचे हे बारावे पुस्तक आहे.
देवरूख येथे श्री सद्गुरु वाचनालयात झालेल्या संगमेश्वर तालुका मराठी साहित्य संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. गोवा येथील साहित्य अभ्यासक कृष्णाजी कुलकर्णी, रत्नागिरीतील साहित्यिका जयश्री बर्वे, ज्येष्ठ समीक्षक प्रा. सुरेश जोशी, संमेलनाध्यक्षा डॉ. वर्षा फाटक आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष ग. के. जोशी यांच्या हस्ते व्हाईट बोर्ड पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पंडित हे श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक आहेत. त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबवले आहेत. त्यात मूल्यशिक्षणाचा प्रयोग, बालोत्सव या वार्षिक अंकाची निर्मिती, विंदा वंदन आणि अन्य काव्यवाचनाचे प्रयोग, स्टुडंट्स प्रेस जर्नल या वृत्तपत्राची निर्मिती, आकार ही कला कार्यशाळा, निवृत्त सैनिकांच्या शाळाभेटी आणि विद्यार्थ्यांसाठी मुलाखती असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.