कोकण

ओमळी येथे महिलांचा विशेष गौरव

CD

- rat१०p३.jpg-
P२६O२९८७१
सावर्डे : ओमळी येथे कष्टकरी महिला व अंगणवाडी सेविकांचा गौरव पूजा निकम यांच्या पुढाकाराने करण्यात आला.

ओमळी येथे महिलांचा विशेष गौरव
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १० ः आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून ओमळी (ता. चिपळूण) येथे समाजासाठी निःस्वार्थ सेवा देणाऱ्या कष्टकरी महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्या संकल्पनेतून या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सावर्डेत झालेल्या कार्यक्रमावेळी उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना निकम म्हणाल्या, महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कष्टकरी महिला अनेक अडचणींवर मात करून समाजासाठी योगदान देत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या अधिक प्रभावीपणे काम करू शकतात.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या पूजा वावरे, संध्या सुर्वे, अरुणा घाडगे, वैष्णवी चव्हाण आणि ज्ञानदीप वाचनालयाच्या सचिव बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Result: आयआयटीची पदवी आणि बड्या पगाराची नोकरी लाथडली! शेतकऱ्याचा लेक बनणार 'जिल्हाधिकारी'; पहिल्याच प्रयत्नात गाजवलं मैदान

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

Latest Marathi News Live Update : व्यावसायिकांना गॅस सिलेंडर बंद झाल्याने हॉटेल चालकाने चुलीवर स्वयंपाक करण्यास केली सुरुवात

सर्वात कमी वयात ICC ट्रॉफी जिंकणारे भारतीय; रोहित शर्मा अव्वल

SCROLL FOR NEXT