कोकण

पूर्णगड शाळेत ''आनंदी बाजार'' उत्साहात

CD

पूर्णगड शाळेत ‘आनंदी बाजार’ उत्साहात
चिमुकल्यांनी अनुभवले व्यवहाराचे धडे ; विविध स्पर्धांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ मध्ये ‘जागतिक महिलादिन’ आणि ‘आनंदी बाजार’ हे दोन्ही उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडले. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी केवळ आनंदच लुटला नाही तर दैनंदिन व्यवहाराचे प्रत्यक्ष धडेही गिरवले.
या कार्यक्रमाची सुरुवात महिलादिनानिमित्त देशातील थोर महिलांच्या प्रतिमापूजनाने आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरवलेल्या ‘आनंदी बाजारा’चे उद्‍घाटन करण्यात आले. मुलांना वस्तूंची खरेदी-विक्री समजावी, आर्थिक व्यवहार करताना हिशोब अचूक असावा, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व कळावे, या उद्देशाने या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः विक्रीला आणलेल्या वस्तूंची आकर्षक जाहिरात करणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे, यातून त्यांच्यातील जीवनकौशल्ये आणि नवनिर्मितीला वाव मिळाला. ‘आनंददायी शिक्षण’ या संकल्पनेचा हा मूळ उद्देश या निमित्ताने साध्य झाला.
महिलादिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांसाठी विविध ‘फनीगेम्स’ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या स्नेहभोजनाने झाली. या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, विविध समित्या, पालक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. पावस बीटच्या शिक्षणविस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT