कोकण

राजापूर पंचायत समितीची पहिली मासिक २४ रोजी

CD

राजापूर पंचायत समितीची सभा २४ला
पदाधिकाऱ्यांकडे लक्ष ; टंचाई आराखड्यावर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः सभापती आणि उपसभापती निवड झाल्यानंतर पंचायत समितीची पहिली मासिक सभा २४ रोजी राजापूर येथील किसान भवन सभागृहामध्ये सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती अभिजित गुरव यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
पंचायत समितीच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना तालुक्याचा विकास आणि सध्या सुरू असलेली विकासकामे यांच्याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा, या सभेमध्ये होणार आहे. यामध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली नुकताच तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासंबंधित महत्त्वपूर्ण चर्चा या वेळी अपेक्षित आहे. त्यामुळे चार वर्षानंतर होणाऱ्या पंचायत समितीच्या पहिल्या मासिक आढावा बैठकीला नवे कारभार कसे सामोरे जाणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
----
विरोधक नसलेले सभागृह
पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप महायुतीने दणदणीत विजय मिळवत सर्वच्या सर्व म्हणजेच बाराही जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सभागृहात विरोधकच उरलेले नाहीत. पदाधिकाऱ्यांना एकहाती कारभार चालवणे सोपे जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

SCROLL FOR NEXT