कोकण

६० नळपाणी योजनांची होणार दुरुस्ती

CD

ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सुटणार
नळपाणी योजनांच्या दुरस्तीसाठी, साडेपाच कोटींचा निधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ६० नळपाणी पुरवठा योजना नादुरूस्त झाल्याने हजारो ग्रामस्थांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने या योजनांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ५३ लाख ९० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर ४१ गावांतील ६० वाड्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विंधन विहिरी आणि नळपाणी योजनांचे जाळे विस्तारण्यात आले आहे; मात्र, योग्य देखभाल-दुरूस्तीअभावी अनेक योजना गेल्या काही काळापासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी पुन्हा विहिरी आणि विंधन विहिरींवर अवलंबून राहावे लागत असून, भटकंती करावी लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता, ज्याला आता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी मूळ पाण्याचे स्रोतच आटले आहेत किंवा खराब झाले आहेत. हे स्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे तरच कोट्यवधी रुपये खर्च करून दुरूस्त होणाऱ्या या योजना दीर्घकाळ टिकतील आणि ग्रामीण जनतेला शाश्वत पाणीपुरवठा मिळेल, अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT