‘खेर्डी’त रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये रस्ते सुरक्षा ही प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व त्यांच्या मनात रुजावे, या हेतूने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी (सती) येथे रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शनपर करण्यात आले.
प्रमुख वक्ते निखिल तुलसिगार यांनी विद्यार्थ्यांना प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, स्पीड ब्रेकरकडे लक्ष देणे, वाहतूक नियमांचे पालन करणे या बाबींचे महत्त्व सांगितले. एक चांगला व जबाबदार रायडर बनण्यासाठी आवश्यक गुण सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.