३०३९३
चेंदवण येथील रस्त्यासाठी
बंगे यांच्याकडून पथदिवे
कुडाळ ः वालावल पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी चेंदवण श्री गवळदेव देवस्थान रस्त्यावर स्वखर्चातून दोन पथदिवे देऊन ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली. याबाबत ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला. श्री गवळदेव देवस्थान हे जंगल भागात असल्याने त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमावेळी होणारी विजेची गैरसोय पाहून चेंदवण येथील प्रशांत तेंडुलकर यांनी बंगे यांच्याकडे मागणी केली. बंगे यांनी धार्मिक कार्यक्रमात जाऊन दोन सौरपथदीप ग्रामस्थांकडे प्रदान केले. यावेळी प्रशांत तेंडुलकर, नीलेश गुरव, प्रकाश ठुंबरे, प्रणाली तेंडोलकर, संतोष प्रभू, प्रभाकर आडेलकर, विलास भरडकर, प्रमोद तेंडोलकर, श्री. घाडी, श्री. देवळी आदी उपस्थित होते
३०३९६
खेळ पैठणीचा स्पर्धेत
मेघा राणे विजेत्या
कुडाळ ः नेरुर येथील खेळ पैठणीच्या या स्पर्धेत मेघा राणे प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक श्रुती नेरुरकर, तृतीय क्रमांक मधुश्री नाईक यांना मिळाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, नेरुर येथे महिला पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, रुद्रा पावसकर, उद्योजक कल्पेश पावसकर यांच्या हस्ते झाला. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरुरसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही पावसकर यांनी दिली. सर्व बक्षिसे रुपेश पावसकर यांनी पुरस्कृत केली. प्रा. सौरभ पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन अंकिता राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगिता म्हाडदळकर, भूषण सारंग, चैतन्या चव्हाण, भक्ती फोंडेकर, धनश्री मेस्त्री, श्रद्धा गोसावी, प्रतीक्षा दळवी, कीर्ती चव्हाण, करिष्मा खानविलकर, मिलिंद नाईक, वैभव आकेरकर, अपर्णा म्हापणकर यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.