swt1313.jpg
30570
सावंतवाडी: येथील भोसले नॉलेज सिटी मध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अस्मिता सावंत-भोसले.
भोसले नॉलेज सिटीमध्ये
विविध उपक्रमांना प्रतिसाद
सावंतवाडी, ता.१३:येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेच्या अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा, वायबीसीपीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, वायबीआयटीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "महिलांचे शिक्षण हाच समाजाच्या प्रगतीचा पाया आहे.’’
डॉ. विजय जगताप यांनी महिलांनी विविध क्षेत्रांत सिद्ध केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करत, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. ले. कर्नल रत्नेश सिन्हा यांनी भावी पिढीमध्ये महिलांप्रती आदराची भावना निर्माण होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमांतर्गत विविध स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका महिमा चारी यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्याबद्दल, तसेच भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल विभागातील अधिव्याख्याता हवाबी शेख यांचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली, तर यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेवर आधारित प्रयोग सादर केला. महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत द्विगुणित झाली. सूत्रसंचालन नमिता भोसले, स्वाती नाईक व अवंतिका वैद्य यांनी केले. हवाबी शेख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवाबी शेख, मानसी कुडतरकर, प्रणाली जोशी, अद्विका आरोलकर, अंजना वैद्य, ऋतुजा तुळसकर, प्राजक्ता राणे व हेमांगी नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.