कोकण

वारंगाची तुळसुली'' गोशाळेत प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम

CD

वारंगाची तुळसुली'' गोशाळेत
प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम
कुडाळ , ता. १२:अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या सुलभाताई दोंदे यांच्या जयंतीचे आणि महिला दिनाचे औचित्य साधून, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ (महिला सेल, कुडाळ) यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. महिला सेलच्या अध्यक्षा स्नेहा सावंत व सचिव ऋतुजा गावडे यांच्या संकल्पनेतून श्रीकृष्ण आनंदवन गोशाळा, वारंगाची तुळसुली येथे हा उपक्रम पार पडला.
पारंपारिक कार्यक्रमांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात गो-सेवेच्या माध्यमातून महिला दिन साजरा केल्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित महिला शिक्षिकांनी गोशाळेतील गायींना चारा भरवला आणि मनोभावे गो-पूजन केले. या प्रसंगी महिलांनी देशी गायींचे महत्त्व आणि गो-पालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने, महिला सेलच्या वतीने गोशाळेला मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय सचिव व राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, राज्य संघाचे पदाधिकारी राजा कविटकर, जिल्हा पदाधिकारी तसेच कुडाळ तालुका अध्यक्ष यल्लाप्पा दळवी, सचिव विजय धामापूरकर, महिला सेल अध्यक्षा स्नेहा सावंत, सचिव ऋतुजा गावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT